कोरोना; देशात 1 लाख 10 हजारांपेक्षा अधिकांचा बळी
जगभरासह देशात कोरोना विषाणू जीवघेणा ठरत आहे. आत्तापर्यंत देशभरात 1 लाख 10 हजार 586 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
तर देशभरात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आत्तापर्यंत 72 लाख 39 हजार 390 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
तसेच देशभरात कोरोना विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक असून आत्तापर्यंत 63 लाख 1 हजार 928 जणांनी कोरोनावर मात केली.
त्याचप्रमानं देशभरात 8 लाख 26 हजार 876 कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारसह कोविड योध्यांनी कंबर कसली आहे.