Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानग्रस्तांना 11 धनादेश वाटप!

मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानग्रस्तांना 11 धनादेश वाटप!


राज्यावर अस्मानी संकट कोसळल्याने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून तातडीने मदतकार्य करण्यास सुरुवातही केली आहे.

मदत : नुकसानग्रस्तांना धीर देत मुख्यमंत्र्यांना 10 लाखांची प्रातिनिधिक मदत दिली आहे.

पाहणी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावेळी अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 
चर्चा : नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. मुख्यमंत्र्यांनी सांगवी खूर्द येथे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. 

 या भागात 150 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून 11 धनादेशांचे वाटप केले. 

पडझड झालेल्या प्रत्येक घराला 95 हजारांची मदत दिली आहे.