देशातील कोरोनाबाधितांची संख्या 73 लाखांवर
देशात गेल्या 24 तासांत 680 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने 67,708 रुग्णांची नोंद झाली आहे.
यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 73,07,098 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
अॅक्टिव्ह रुग्ण : आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या 8,12,390 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असून ते रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
डिस्चार्ज : तसेच 63,83,442 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1,11, 266 कोरोनाबाधित रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे.