शक्तीपीठ : महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे.
या मंदिराचे बांधकाम कोणी केले, याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही.
काही संशोधकांनी असे म्हटले आहे की, शिलाहार राजवटीपूर्वी कार्हारक (आजचे कराड) येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेले आहे.
या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलेले आहे.
मंदिराची रचना
महालक्ष्मीची मूर्ती 01.22 मीटर उंच आहे आणि एका 0.91 मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे.
या मंदिरामध्ये घाती दरवाजा, गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत.
मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे 1844 ते 1967 च्या दरम्यान बनवले गेले आहे.
मंदिरामध्ये जवळपास 20 पुजारी आहेत, जे पारंपारिक विधीपूर्वक देवीची पूजा करण्यात पारंगत आहेत.
प्रत्येक शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. येथे भक्त मोठ्या संख्येने येतात