श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजाभवानी
भारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते.
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे.
पौराणिक कथा :
स्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे. कृतयुग म्हणजेच जवळपास 17 हजार वर्षापूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ध्यान करत होती.
तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला स्वत: ला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला.
त्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले.
त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली.
या देवीला तुर्जा-तुळजा (भवानी) असेही म्हटले जाते.
देवीचे मंदिर बालाघाटावरील एक डोंगरमाथ्यावर आहे.
नवरात्रीचा उत्सव जरी 09 दिवसांचा असला तरी तुळजापुरात, हा उत्सव 21 दिवस चालतो.