Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

साडेतीन शक्तीपीठ - सप्तशृंगीदेवी, वणी

साडेतीन शक्तीपीठ - सप्तशृंगीदेवी, वणी



 साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धा शक्तीपीठाचा मान हा संप्तश्रुंगीदेवीचा आहे. 

● येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे, असं मानण्यात येतं. 

● पृथ्वीतलावर जंगदंबेची वेगवेगळी रूपं आहेत. त्यापैकी सप्तशृंगीदेवीचे रूप या तीन देवींचे एक रूप आहे. 
● शुंभनिशुंभ आणि महिषासुर या राक्षसांचा वध केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करायला राहत होती. अशी आख्यायीका सांगण्यात येते. 

● सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये सात शिखरं आहेत. त्यावरूनच या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गड ठेवण्यात आले आहे. 

● हे मंदिर डोंगराची कपार खोदून तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये महिरपीत देवीची आठ फूटाची मूर्ती अठरा भुजा मूर्ती आहे.  

● मूर्ती शेंदूरअर्चित, रक्तवर्ण असून डोळे टपोरे आहेत. यामुळे देवीचं रूप तेजस्वी दिसतं. 

● त्याचप्रमाणे देवीचे सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुरासारख्या राक्षसाचा नाश करण्यासाठी देवीला शस्त्रही दिली आहेत.