राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणात वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाऊस : तर आज रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल.
अंदाज : तसेच मंगळवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
दरम्यान, अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवाधार पाऊस पडला.
प्रभाव: हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तिथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील 24 तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल.