पुन्हा होणारा कोरोना संसर्ग गंभीर...
भारतात कोरोनाचा संसर्ग उलटण्याची तीन संशयित प्रकरणं समोर आली आहेत. धक्कादायक म्हणजे पुन्हा होणारा कोरोनाचा संसर्ग गंभीर असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.
त्यापैकी दोन मुंबईत आणि एक अहमदाबादमध्ये आहे. इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्चने ही माहिती दिली आहे.
दरम्यान लँसेट जर्नलमध्ये कोरोना व्हायरसच्या रिइन्फेक्शनबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि त्याची लक्षणं अधिक गंभीर होतात असं या अहवालात म्हटलं आहे.
जर काही आठवड्यातच संसर्ग पुन्हा होत असेल तर इम्युनिटी किती कालावधीसाठी राहते असा प्रश्न उपस्थित होतो.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मिळणारी इम्युनिटी जास्त काळ राहत नाही. काही आठवडे किंवा त्यापेक्षाही कमी कालावधी राहत असावी.
त्यामुळे हर्ड इम्युनिटीसाठी नैसर्गिक इम्युनिटीवर राहण्याऐवजी लसच सुरक्षित आहे, असं संशोधक अनंत भान यांनी सांगितलं.