देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७६ लाखांपुढे
देशभरातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ७६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. २४ तासांमध्ये देशात ५४ हजार ४० नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ७१७ मृत्यूंची नोंद झाली आहे.
याचबरोबर देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७६ लाख ५१ हजार १०८ वर पोहचली आहे.
देशात ७ लाख ४० हजार ९० अॅक्टिव्ह रुग्ण असून, डिस्चार्ज मिळालेले ६७ लाख ९५ हजार १०३ जण व आतापर्यंत १ लाख १५ हजार ९१४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील २४ तासांमध्ये ६१ हजार ७७५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, ८ हजार ४४८ अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले आहेत.
२० ऑक्टोबरपर्यंत देशभरात ९,७२,००,३७९ नमूने तपासले. त्यापैकी १० लाख ८३ हजार ६०८ नमूने काल तपासले.