तुझं-माझं करु नका, शेतकऱ्याला मदत जाहीर करा; संभाजीराजे
पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेते मंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत.
खासदार संभाजीराजे यांनी लातूर जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.
त्यानंतर तुझं-माझं करु नका, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.
संभाजीराजे म्हणाले :
केंद्र आणि राज्य सरकारने तुझं-माझं न करता शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेऊन तातडीने मदत जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा.
शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे.
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसंच राज्याच्या काही भागांत घरांचं तसंच शेतीचं मोठं नुकसान झालंय.