'ही' कंपनी रशियन लसीची भारतात विक्री करणार
स्वदेशी कोरोना लस विकसित होण्यासाठी जवळपास एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्याआधीच कोविड १९ ची रशियन स्पुटनिक- व्ही ही लस भारतात उपलब्ध होऊ शकते.
दिल्लीतील मॅनकाईंड फार्मा कंपनीने RDIF शी करार केला आहे. याअंतर्गत भारतात लसीचे मार्केंटिंग आणि वितरण केले जाणार आहे.
किती क्षमतेने लसीचे डोज तयार केले जाणार आहेत, याबाबत माहिती स्पष्ट झाली नाही. मॅनकाईंड व्यतिरिक्त डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजनेही लसीसाठी RDIF शी भागीदारी केली आहे.
दुसरीकडे इस्त्राईलने आपल्या कोरोना लसीचे नाव 'Brilife' असे ठेवले आहे. माणसांवर या लसीचे परिक्षण ऑक्टोबर महिना अखेरपासून सुरू होईल.