आयडिया, वोडाफोनचे नेटवर्क गुल; अर्धा महाराष्ट्र नाॅट रिचेबल !
देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ढेपाळले आहे.
पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना Vi च्या कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास सहन करावा लागत आहे.
कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर ग्राहकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली. सकाळ पासून व्हीआयचे नेटवर्क गेल्याने अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागला.
नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणे अवघड बनले आहे. काहींनी ट्विटरवर Vi च्या नेटवर्कबाबत तीव्र नाराज व्यक्त केली आहे.