Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

रेमडेसिविर औषध कोरोनावर किती परिणामकारक आहे; WHO ने दिली माहिती

रेमडेसिविर औषध कोरोनावर किती परिणामकारक आहे; WHO ने दिली माहिती



 सध्या जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरु असून त्यावर लस शोधण्याचे काम सुरु आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी  रेमडेसिविर या औषधाचा उपयोग केला जात आहे.

 हे औषध कोरोना विषाणूला आपले जेनेटिक मटेरियल रिलीज करण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण करते. मात्र हे औषध किती उपयुक्त आहे याविषयी आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) खुलासा केला आहे.
रेमडेसिविरची परिणामकारकता :

 हे औषध सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात परिणामकारक दिसले नसून या औषधामुळे रुग्णाच्या संसर्गाचे दिवसही कमी झालेले नाहीत.

 यासाठी 30 देशांमधील 11 हजारांहून अधिक वयस्कर रुग्णांवर या औषधाचे संशोधन केले असता बाधित रुग्णांवर सदरील औषधाचे कोणतेही सकारात्मक परिणाम आढळले नाहीत.

 दरम्यान, रेमडेसिविर औषध गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचा जीव वाचवण्यात फारसे प्रभावी ठरले नसून या औषधामुळे मृत्युदरातही विशेष फरक पडला नसल्याचे WHO ने म्हटले आहे.