Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

देशात गेल्या 24 तासात 'एवढ्या' जणांना कोरोनाची लागण

देशात गेल्या 24 तासात 'एवढ्या' जणांना कोरोनाची लागण



 देशात गेल्या 24 तासात 40 हजारांपेक्षा कमी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाने देशभरात सुमारे 85 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासले आहे. सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

 केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 38 हजार 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 448 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 85 लाख 91 हजार 731 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 5 लाख 5 हजार 265 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 27 हजार 59 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 79 लाख 59 हजार 406 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे.