बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या आगामी 'दुर्गावती' चित्रपटाचे नाव बदलून 'दुर्गामती'
बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या आगामी 'दुर्गावती' चित्रपटाचे नाव बदलून 'दुर्गामती' असे ठेवण्यात आले आहे.
हा चित्रपट 'भागमती' या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
भूमी पेडणेकरने आपल्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
अभिनेत्रीने पोस्टर शेअर करत लिहिले की, 'येत आहे… दुर्गामती.' या पोस्टरमध्ये भूमी खूपच इंटेंस लुकमध्ये आरशासमोर असल्याचे दिसते.
भूमीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.
हा हॉरर-थ्रिलर चित्रपट पुढील महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.