Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

रेमेडिसविर कोरोनावरील औषध यादीतून बाद

रेमेडिसविर कोरोनावरील औषध यादीतून बाद

बुलेटिन वेब टीम 

 

 WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने कोरोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर हे औषध यादीतून बाद केलं आहे.

 कोरोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध सर्रास देण्यात येत होतं. मात्र आता हे औषधांच्या यादीतून WHO ने बाद ठरवलं आहे. 

 हे औषध कोरोना बरं होण्यासाठी गुणकारी ठरतं यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही, असंही WHO ने म्हटलं आहे.
 ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो, त्यांनी तो बंद करावा असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. 

 जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला हा सल्ला अनेकांना चुकीचा वाटू शकतो, कारण अनेक देशांमध्ये वैज्ञानिकांनी कोरोनावर रेमेडिसविर हे औषध लागू पडत आहे असं म्हटलं आहे. मात्र WHO ने औषध यादीतून बाद केलं आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार, WHO चे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी एका इमेलला पाठवलेल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, “होय आम्ही रेमेडिसविर हे औषध PQ प्रीक्वालिफिकेशन लिस्टमधून बाद केलं आहे. 

 कोरोनावर उपचार करण्यासाठी एकाही देशाने हे औषध खरेदी करु नये.” असंही त्यांनी म्हटलं आहे.