चारशेहुन अधिक शिक्षकांना कोरोनाची बाधा
राज्यात सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
चारशेहुन अधिक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शाळेत शिकवायला जाणाऱ्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
त्यात अनेक ठिकाणी शिक्षकच कोरोनाबाधित आढळल्याने एकूणच शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर मोठा संभ्रम आहे.
विदर्भात सर्वाधिक 200 शिक्षक बाधित आढळले आहेत. मराठवाड्यात 97, खान्देशात 23 तर पश्चिम महाराष्ट्रात 132 शिक्षक बाधित आढळले आहेत.
विशेष म्हणजे मुंबईत डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी चाचण्यांमध्ये एकही शिक्षक कोरोनाबाधित आढळलेला नाही.