असे दहा करियर ऑप्शन . ज्याचा विचार करून तुम्ही भविष्याची दिशा ठरवू शकता.
बुलेटिन वेब टीम
अनेकदा जे करियर आपण निवडणार आहोत त्याला भविष्यात किती मागणी असेल? याबाबतीत आपण चिंतीत असतो. आज आम्ही तुम्हाला असे दहा करियर ऑप्शन सांगणार आहोत. ज्याचा विचार करून तुम्ही भविष्याची दिशा ठरवू शकता.
1) अॅप डेव्हलपर्स : आजच्या या इंटरनेटच्या युगात अॅप डेव्हलपर्सना खूप मागणी आहे.
2) सॉफ्टवेअर डेव्हलपर्स : गरजेनुसार जीवन सोपे बनवण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर मागणी असल्याने सॉफ्टवेअर इंजिनियरला बाजारात मोठी मागणी आहे.
3) डेटा अॅनालिस्ट : तंत्रज्ञान विकसित होत असल्याने 'डेटा' चे काम वाढत आहे. अशात या वाढीव डेट्याचे योग्य विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांची गरज पडणार आहे.
4) वेलनेस एक्स्पर्ट : येणाऱ्या काळात ब्यूटीशियन, फिटनेस ट्रेनर, कौन्सिलर्स आणि थेरपिस्ट सारख्या एक्स्पर्ट लोकांची खूपच गरज भासणार आहे त्यामुळे तयार राहा.
5) स्मार्ट होम इंजिनियर्स : पाश्चिमात्य देशांप्रमाणे भविष्यात आपली घर सुद्धा स्मार्ट होणार आहेत. त्यामुळे स्मार्ट होम इंजिनियर्सला भविष्यात डिमांड असेल.
6) 3डी डिझायनर्स : येणारा काळ हा व्हर्च्युअल रियलिटीचा आहे. चित्रपट 3डी असतात, टीव्ही3डी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात थ्रीडी इंजिनियर्सना कमाई करण्याच्या खूप संधी असतील.
7) कन्स्ट्रक्शन एक्स्पर्ट : येणाऱ्या काळात जगात खूप मोठे बदल होणार आहेत. जागा कमी असणार आहे आणि गरज जास्त. त्यामुळे घरबांधणीचे प्रकार सुद्धा बदलावे लागतील.
8) प्राथमिक शिक्षक : जग कितीही अॅडव्हान्स झाले तरी लहान मुलांसाठी शिक्षकांची गरज भासणारच आहे. आणि येणाऱ्या काळात तर ही मागणी अधिकच वाढू शकते.
9) सेल्स मॅनेजर : तुमच्याकडे जर एखादी गोष्ट विकण्याची कला असेल तर तुमचे भविष्य उज्वल आहे. भविष्यात ही सेल्स मॅनेजरची डिमांड कमी होणार नाही.
10) नर्स : हा एक असा पेशा आहे ज्याची मागणी आजही कमी नाही. आणि येणाऱ्या काळात सुद्धा यात काही बदल होण्याची चिन्हे दिसत नाही.