अमेरिका, रशियाने कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निकाल जारी केला. या लशी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा संबंधित औषध कंपन्यांनी केला होता.
दरम्यान आता भारतात सुरू असलेल्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची नोंदणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिली आहे.
प्रक्रिया : कोव्हिशिल्ड लशीनं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमधील महत्त्वपूर्ण अशी प्रक्रिया पार केली आहे. त्यामुळे लवकरच ही लस मिळण्याची आशा आहे.
भागीदारी : अॅस्ट्रेझेनका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेली ही लस आहे. यामध्ये भारतातील पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची भागीदारी आहे.
शक्यता : सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी पुढील वर्षात जानेवारीतच कोरोना लस येईल अशी शक्यता वर्तवली आहे.
डोस : ऑक्सफोर्डची कोरोना लस प्रभावी आणि सुरक्षित ठरली तर सीरम इन्स्टि्युट या लशीचे 100 कोटी डोस तयार करण्यात येणार आहेत.