Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

भारत सरकारकडून 'Covin App' लाँच

भारत सरकारकडून 'Covin App' लाँच

 कोरोना लसीसंदर्भात माहितीसाठी भारत सरकारकडून 'Covin App' लाँच करण्यात आलं आहे.

 या अ‍ॅपद्वारे देशभरातील नागरिकांना कोरोना लसीचा साठा, वितरण, आणि स्टोरेजसंदर्भात माहिती दिली जाणार आहे.

 कोरोना व्हॅक्सिनचा साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानावरही कोव्हिन अॅपचं लक्ष असणार आहे.

 या अॅपद्वारे साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानात होणाऱ्या बदलांबाबतची माहिती मिळेल. 
 दरम्यान, तुम्हाला लस कधी दिली जाणार आहे, याबाबतची माहितीदेखील या अ‍ॅपद्वारे नागरिकांना मिळणार आहे.

 तसेच तुम्हाला लस दिल्यानंतर त्याचं प्रमाणपत्रदेखील या अ‍ॅपद्वारे तुम्हाला दिलं जाणार आहे. 

 तुम्हाला लस दिल्यानंतर आपोआप या अॅपमध्ये संबंधित प्रमाणपत्र जनरेट होणार आहे.