न्यूझीलंडने पहिल्या टी 20 सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने शानदार विजय
न्यूझीलंडने पहिल्या टी 20 सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.
यासह न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते.
हे विजयी आव्हान न्यूझीलंडने 5 विकेट्स गमावून 7 चेंडू राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडकडून टीम सायफेर्टने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या