Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा टी-20 सामना जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठीही भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा टी-20 सामना जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठीही भारतीय संघ सज्ज

 आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा टी-20 सामना जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठीही भारतीय संघ सज्ज आहे.

 या अगोदरच भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करीत टी-20 मालिका 2-0 अशा फरकाने आपल्या खिशात घातली आहे. 

 दरम्यान यजमान ऑस्ट्रेलियाला मात्र प्रतिष्ठा राखण्यासाठी आज अखेरची लढत जिंकून आत्मविश्वास संपादन करणे गरजेचे आहे. 
संघात बदल होण्याची शक्यता! :

● ऑस्ट्रेलियन संघात बदल कर्णधार अ‍ॅरोन फिंच संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. 

● स्टीवन स्मिथला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

● तसेच जोश हेझलवूडला आज खेळण्याची शक्यता नाही. 

दरम्यान भारतीय संघाची गोलंदाजीची भिस्त टी. नटराजन, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर यांवर असणार आहे. शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, हार्दिक पांडय़ा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन हे फलंदाज म्हणून कायम असतील.

खेळपट्टी कशी आहे? : सिडनीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल.  हवामानामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यामुळे गोलंदाजी व फलंदाजी करताना काही योजनांमध्ये बदल करावा लागेल. 

सामन्याची वेळ : दुपारी 1.40 पासून I थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क