इज्राइल देशात 27 डिसेंबरपासून नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार,
इज्राइल देशात 27 डिसेंबरपासून नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार, असल्याची घोषणा इज्राइलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी केली आहे.
इज्राइलमध्ये सार्वजनिक स्तरावर कोव्हिड 19 लसीकरण सुरू केलं जाणार आहे.
देशाची एकूण लोकसंख्या 90,00000 लाख असून एका दिवसात 60,000 लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे.
ज्यांना कोरोना लस दिली जाईल त्यांना एक स्पेशल कार्ड दिलं जाईल किंवा मोबाइलवर फ्री अॅप्लिकेशन दिलं जाईल.
लसीकरणानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होणार असून सर्वांनी लसीकरण करावं, यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, इज्राइलमध्ये कोरोना बाधितांची संख्या 350,000 प्रकरणं आहेत, तर 2, 900 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.