आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे क्रिकेटमधील फलंदाज आणि गोलंदाजांची रॅंकिग जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे क्रिकेटमधील फलंदाज आणि गोलंदाजांची रॅंकिग जाहीर केली आहे.
या बॅटिंग रॅंकिगमध्ये पहिल्या 2 स्थानांवर टीम इंडियाचे खेळाडू आहेत. कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा यांनी आपलं स्थान कायम राखलं आहे.
तर गोलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहची एका क्रमांकाने घसरण झाली आहे.
विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील 3 वन डे सामन्यांच्या मालिकेत अनुक्रमे 21, 89, 63 अशा एकूण 173 धावा केल्या आहेत.
दरम्यान, विराट एकूण 870 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर हिटमॅन रोहित शर्मालाही 842 पॉइंट्स दुसरं स्थान कायम राखण्यास यश आलं आहे.