Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

कोरोनाबाधितांची संख्या ९५ लाखांच्या उंबरठ्यावर

कोरोनाबाधितांची संख्या ९५ लाखांच्या उंबरठ्यावर

देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९५ लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. 

 मागील २४ तासांमध्ये ३६ हजार ६०४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९४ लाख ९९ हजार ४१४ वर आहे. याच कालावधीत ५०१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशभरातील एकूण संख्या आता १ लाख ३८ हजार १२२ झाली आहे. 

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४ लाख २८ हजार ६४४ वर आहे. याशिवाय मागील २४ तासांमध्ये ४३ हजार ६२ जण  कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. 

 आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची देशातील एकूण संख्या आता ८९ लाख ३२ हजार ६४७ झाली आहे.