ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला असून फ्रान्सने त्या देशासमवेतच्या सीमा बंद केल्या आहेत.
भारत, जर्मनी, बल्गेरिया, आयरिश प्रजासत्ताक, तुर्कस्तान व कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली.
कोरोना विषाणू नवीन आणि अधिक धोकादायक असा यूव्हीआय २०२०१२/०१ हा स्ट्रेन असणारा विषाणू ब्रिटनसह इतर पास देशांमध्ये सापडला आहे.
ब्रिटनसह ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड्स, जिब्राल्टर आणि डेनमार्क या देशांचा समावेश आहे.
याशिवाय हा स्ट्रेन असणारा नवा कोरोना विषाणू बेल्जियममध्येही आढळून आल्याची शक्यता वर्तवली जाते.
दरम्यान, डेन्मार्कमधील नऊ रुग्णांमध्ये हा नवीन स्ट्रेन विषाणू आढळूला तर ऑस्ट्रेलियातही आढळला असून नेदरलँड्समधेही आढळून आला आहे.