खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खानने चित्रपट 'अतरंगी रे'च्या शूटिंगला सुरुवात
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खानने चित्रपट 'अतरंगी रे'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 'अतरंगी रे'मध्ये अभिनेता धनुष प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहे. काही तासांपूर्वीचे सारा अली खान आणि अक्षय कुमार 'अतरंगी रे'च्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
खिलाडी अक्षय कुमारने सारासोबतचा सेटवरील फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'हे तीन जादूचे शब्द, लाईट, कॅमेरा, अॅक्शन यामध्ये जो आनंद आहे, त्याचे काही मुल्य नाही आहे.
'अतरंगी रे'चे शूटिंगला सुरुवात केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहे. आता तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.'
अक्षयने सांगितले की, 'संगीत सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान करत आहे. या चित्रपटाचे लेखन हिमांशू शर्माने केले आहे.'