ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कोसळले
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कोसळले आहे.
सध्या मिथुन हे त्यांच्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.
त्यांची तब्येत अचानक खालावली आणि ते सेटवरच कोसळले. त्यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाचं शूटिंग थांबवलं आहे.
फूड पॉयझनिंगमुळे त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटामध्ये मिथून चक्रवर्तींसोबतच अनुपम खेर, पुनित इस्सार यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत.