Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

टी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यातून जडेजा बाहेर

टी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यातून  जडेजा बाहेर 

 भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. 

 त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरची निवड केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची अधिकृत घोषणा केली.
बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने सामन्याच्या ब्रेक दरम्यान ड्रेसिंग रूममधील क्लिनिकल मूल्यांकनानुसार जडेजाच्या निदानाची पुष्टी केली. 

 जडेजा निरीक्षणाखाली असून आज शनिवारी (दि.५) सकाळी आवश्यकतेनुसार त्याची पुढील तपासणी केली जाईल.

 सध्या सुरू असलेल्या टी२० मालिकेचा तो भाग असणार नाही, असे बीसीसीआयने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.