राजकारणावर आधारित अभिनेता सैफ अली खानची आगामी वेबसिरीज ‘तांडव’ अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेटीला येणार
राजकारणावर आधारित अभिनेता सैफ अली खानची आगामी वेबसिरीज ‘तांडव’ अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेटीला येणार आहे.
या वेबसिरीजची निर्मिती अली अब्बास जफरने केली असून नुकताच याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
एक मिनिटांच्या टीझरमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
टिझर पहा : https://youtu.be/P3Ld5wHfVW4
यात सैफ अली खानसोबत त्यात डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार दिसणार आहेत.
ही वेबसिरीज 9 भागांची असणार आहे. ती येत्या 15 जानेवारी 2021ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.