द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने त्याचा आगामी चित्रपट 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
हा ऐतिहासिक चित्रपट पुढील वर्षात म्हणजेच 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर अर्जुन याची वाढलेली दाढी, लांब केसामधील लूक हा एका योद्धासारखा दिसून येत आहे.
द बॅटल ऑफ भीमा कोरोगाव चित्रपटात दिगंगना सूर्यवंशी, अभिमन्यू सिंह आणि सनी लिओनी झळकणार आहेत.
या चित्रपटाचा भाग होण्याचा मला अभिमान आहे, एक सशक्त संदेश असलेला चित्रपट, इतिहासाचा एक भाग पुन्हा भेटला असल्याचं पोस्टरचा कॅप्शन देत अर्जुनने म्हटलं आहे.