केनियाच्या किबीवोट कॅण्डीने हाफ मॅरेथॉनमध्ये जागतिक विक्रमाची नोंद
केनियाच्या किबीवोट कॅण्डीने हाफ मॅरेथॉनमध्ये जागतिक विक्रमाची नोंद केली.
किबीवोट कॅण्डीने 57 मिनिटे व 32 सेकंदांत वॅलेण्सीया हाफ मॅरेथॉन पूर्ण करीत नव्या विक्रमावर मोहोर उमटवली.
58 मिनिटांच्या आतमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा तो पहिलाच धावपटू ठरला आहे.
यापूर्वी जेफ्री कॅमवोरोर याने 2019 सालातील सप्टेंबर महिन्यात 58.01 अशी वेळ देत हाफ मॅरेथॉन पूर्ण करीत विक्रम नोंदवला होता.
किबीवोट कॅण्डीने रविवारी नव्या विक्रमाला गवसणी घातली हे विशेष.