ऋषभ पंतने क्रमवारीत 45 व्या स्थानावरुन थेट 26 व्या स्थानी झेप
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
सिडनी कसोटीत सरस कामगिरी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने क्रमवारीत 45 व्या स्थानावरुन थेट 26 व्या स्थानी झेप घेतली आहे.
तर, भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे.
कोहली दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर तर, रहाणे सहाव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरला आहे.
चेतेश्वर आठव्या स्थानावर आला आहे. क्रमवारीत पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तर, दुसऱ्या स्थानावर स्टिव्ह स्मिथ आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर तर, रवीचंद्रन अश्विन सातव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर घसरला आहे.
जोश हेजलवूड पाचव्या क्रमांकावर असून भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे.