कोरोनाच्या धोक्यामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी सध्या युद्धपातळीवर
कोरोनाच्या धोक्यामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.
स्पर्धेचे काउंटडाऊनही सुरु झाले आहे. मात्र, खर्च वाढला असला, तरी आयोजकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
कामाला सुरुवात केल्यावर आयोजकांनी पहिल्या टप्प्यात उदघाटन आणि समारोप सोहळ्यासाठी नव्या समितीची नियुक्ती केल्याचे जाहिर केले.
आता या दोन्ही सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी या नव्या समितीवर असेल.