अभिनेता विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांचा 'द पॉवर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज
अभिनेता विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांचा 'द पॉवर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
या ट्रेलरमध्ये विद्युतच्या इतर चित्रपटांप्रमाणेच जबरदस्त अॅक्शनही पाहायला मिळत आहे.
ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://www.youtube.com/embed/-q1TmdddcY8
विद्युत आणि श्रुतीचा रोमान्स चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरूवातीलाच पाहायला मिळत आहे.
यानंतर, रिव्हेंज स्टोरी दाखवली जाणार आहे. ट्रेलरमध्ये श्रुतीची स्टाईल देखील पाहण्यासारखी आहे.
रिलीज डेट: या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून 14 जानेवारी रोजी झी 5 वर चित्रपट रिलीज होणार आहे
कलाकार : चित्रपटात विद्युत आणि श्रुती व्यतिरिक्त अभिनेता प्रितीक बब्बर देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.