भारताच्या फुलराणी सायना नेहवाल कोरोना निगेटिव्ह असून ती बुधवारी होणाऱ्या थायलँड ओपनमध्ये सहभागी होणार
भारताच्या फुलराणी सायना नेहवाल कोरोना निगेटिव्ह असून ती बुधवारी होणाऱ्या थायलँड ओपनमध्ये सहभागी होणार आहे.
सायना नेहवाल आणि एचएस प्रणयचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यानंतर ती थायलँड ओपनमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, आता तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ती थायलँड ओपनमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
याआधी लंडन ऑलिम्पिक (2012) ची कांस्यपदक विजेत्या सायनाने बीडब्ल्यूएफ द्वारे कोविड-19 प्रोटोकॉल अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त करत ट्वीट केलं होतं.
सायनाने ट्वीट केलं की, "तपासणीमध्ये सर्व निगेटिव्ह आल्यानंतरही फिजियो आणि प्रशिक्षक आम्हाला भेटू शकत नाहीत? आम्ही चार आठवड्यांपर्यंत स्वतःला फिट कसे ठेवणार. आम्हाला चांगल्या परिस्थिती खेळायचं आहे. कृपया यावर मार्ग काढा.