अश्विनी पोनाप्पा व सात्विक साईराज यांनी विजयी सलामी
थायलंड येथे सुरु असलेल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटाच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात भारताच्या अव्वल मानांकित अश्विनी पोनाप्पा व सात्विक साईराज यांनी विजयी सलामी दिली.
मिश्र दुहेरीच्या पहिल्या सामन्यात अश्विनी व सात्विक जोडीने स्थानिक खेळाडू हाफिज फैजल व ग्लोरिया विद्जाजा यांच्यावर 21-11, 27-29, 21-16 अशी तीन गेममध्ये मात केली.
दरम्यान या स्पर्धेत सहभागी झालेली सायना नेहवाल हि कोरोनाच्या विळख्यात सापडली असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
यामुळे आता एकेरीत महिला गटाची सर्व मदार ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्हि. सिंधू हिच्यावरच आहे.