83' चित्रपट 25 जूनला रिलीज होणार
बॉलिवूड रिपोर्टनुसार रणवीर सिंहचा '83' चित्रपट 25 जूनला रिलीज होणार आहे.
या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाच्या 1983 मधील विश्वचषक विजयाच्या प्रवासापर्यंतची कहाणी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दरम्यान एप्रिल महिन्यात खिलाडी कुमारचा 'सुर्यवंशी' आणि रमजानच्या दिवसांमध्ये सलमान खानचा 'राधे' प्रदर्शित होणार असल्याचं कळत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता 100 टक्के क्षमतेने सिनेमागृह सुरु करण्यास सांगितले आहे.