देशभरात कोरोना कहर
● देशभरात कोरोना कहर वाढत असून गेल्या काही दिवसांत दररोज नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
● शनिवारी दिवसभरात 25 हजार 320 नवीन रुग्ण देशभरात आढळून आले. त्यात एकट्या महाराष्ट्रातील 15 हजार 802 नवीन रुग्णांचा समावेश आहे.
● नव्या वर्षातील एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक नवीन रुग्ण आहेत. महाराष्ट्राच्या मानाने अन्य राज्यांची परिस्थिती बरी आहे.
● इतर राज्यांमध्ये दररोजी सापडणार्या नवीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आहे. हे पाहता महाराष्ट्राची स्थिती अतिशय बिकट दिसत आहे.
● देशातील एकूण कोरोना रुग्णांची स्थिती 1 कोटी 13 लाख 59 हजार 48 इतकी झाली आहे.
● त्यापैकी 1 कोटी 9 लाख 89 हजार 897 रुग्ण बरे झाले आहेत. असे असले तरी देशाभरातील सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे.