कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच सेलिब्रेटींच्या उपस्थितीत पाचवा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार
● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच सेलिब्रेटींच्या उपस्थितीत पाचवा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला.
● पुरस्कार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन अमेय वाघ, सिध्दार्थ जाधव आणि मोनिका मूर्ती यांनी केले.
● या सोहळ्यात 'आनंदी गोपाळ' या चित्रपटाने तब्बल 11 पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
● 'बाबा' या चित्रपटासाठी दीपक डोबरियाल सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'स्माईल प्लीज' साठी मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.
आनंदी गोपाळ'ने पटकावलेले पुरस्कार : सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री (क्रिटिक्स).
इतर पुरस्कार :
● सहाय्यक अभिनेता : शशांक शेंडे (कागर)
● सहाय्यक अभिनेत्री : नीना कुलकर्णी (मोगरा फुलला)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : आदर्श शिंदे (तुला जपणार आहे)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : शाल्मली खोलगडे (क्वेरीडा क्वेरिडा)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) : शिवानी सुर्वे (ट्रिपल सीट)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) : शुभांकर ताकडे (कागर)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा)