भारतीय नेमबाजांनी विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत वर्चस्व राखले.
● भारतीय नेमबाजांनी विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत वर्चस्व राखले.
● नवोदित तसेच अनुभवी खेळाडूंच्या भारतीय संघाने जवळपास प्रत्येक गटात वैयक्तीक तसेच सांघिक पदकांची कमाई केली.
● सौरभ चौधरीने मनू भाकरसह तर दिव्यांशसिंग पनवारने एलाव्हेनिल वालारिवानसह दुहेरीत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेतला.
● आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत या नेमबाजांनी 10 मीटर एअर पिस्तूल व 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला.
● सौरभ-मनू यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला मिश्र सांघिक सुवर्णपदक मिळवून देत पदकतालिकेत भारताचे अग्रस्थान अधिक भक्कम केले.
● भारताचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक ठरले. त्याचबरोबर सौरभ-मनूचे हे मिश्र सांघिक प्रकारातील पाचवे सुवर्णपदक ठरले.