चंद्र आहे साक्षीला' ही मालिका संपणार
'चंद्र आहे साक्षीला' ही मालिका संपणार असल्याचे समजते. टीआरपीचे कारण देत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती मिळते.
तर 'बायको अशी हव्वी' या नव्या मालिकेचा प्रोमो झळकला आणि त्याविषयी बोलायचे सोडून प्रेक्षक कोणती मालिका बंद होणार' यावरच चर्चा करू लागले आहेत.
तसेच नव्या मालिकेविषयी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या. त्यामध्ये 'जीव झाला येडापिसा' ही मालिका बंद करू नका' हे सांगणाऱ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर आहेत.
दरम्यान, 'बायको अशी हव्वी' या नव्या मालिकेची वेळ अद्याप सांगितली नसल्यामुळे नेमकी कोणती मालिका बंद होणार आहे हे अजून कळलेले नाही.