Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक

● मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानकाचा मान मिळाला आहे. 

● भारतीय उद्योग संघटनेच्या इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या रेटिंगनुसार सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 
● नुकतेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी आपल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकासह आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमितसिंग अरोरा यांच्याकडून आयजीबीसीचे प्रमाणपत्र स्वीकारले आहे.

● मध्य रेल्वेने आपल्या सीएसएमटी स्थानकात विविध हरित उपक्रम राबविले आहेत. 

● पर्यावरणीय परिणामांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी डिजिटल डिस्प्ले यांसारख्या अनेक सुविधा दिल्या आहेत.