गॉडझिला व्हर्सेस किंगकाँग हा चित्रपट ठरलेल्या दिवसाच्या २ दिवस आधीच भारतात प्रदर्शित होणार
हॉलीवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय राक्षस…..तुम्ही ओळखलंच असेल कोण ते? हे राक्षस आहेत गॉडझिला आणि किंग काँग! बऱ्याच जणांनी यांना पाहिलं असेल, पण वेगवेगळं. आता हे दोघे एकत्र येऊन धुमाकूळ घालणार आहेत.
भारतातल्या वॉर्नर ब्रोज पिक्चर्सने सांगितलं की, या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता या चित्रपटाला प्रेक्षक खूप गर्दी करतील असं वाटत आहे.
आम्हाला हे जाहीर करण्यास आनंद होत आहे की, गॉडझिला व्हर्सेस किंगकाँग हा चित्रपट ठरलेल्या दिवसाच्या २ दिवस आधीच भारतात प्रदर्शित होणार आहे, जेणेकरून भारतीय प्रेक्षक ह्या चित्रपटाचा अनुभव घेऊ शकतील.
या चित्रपटात ऍलेक्झँडर स्कार्सगार्ड, मिली बॉबी ब्राऊन, रिबेका हॉल, ब्रायन टायरी हेनरी, इजा गोन्झालेज, ज्युलियन डेनिसन, केल शिंडलर आणि डिमियन विचिन हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. गॉडझिला व्हर्सेस काँग हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्ये भारतभर येत्या 24 मार्चला रिलीज होणार आहे.