महिला टी-20 चॅलेंजर्स स्पर्धा होणे यंदा अशक्य
● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी भारतात प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. यामुळे आगामी महिला टी-20 चॅलेंजर्स स्पर्धा होणे यंदा अशक्य आहे.
● या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज तसेच श्रीलंकेच्या खेळाडू खेळत असतात.
● मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धा पार पडणे अपेक्षित आहे यासाठी भारतीय महिला खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.
● या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या अगोदर खेळाडूंचे विलगीकरण करता येईल मात्र परदेशी खेळाडू भारतात येणे अशक्य असल्याने ही स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते. असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
● गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती या देशात पार पडल्या होत्या.