भारतात गेल्या 24 तासांत सापडलेल्या रुग्णांमध्ये आजवरची विक्रमी वाढ
● भारतात गेल्या 24 तासांत सापडलेल्या रुग्णांमध्ये आजवरची विक्रमी वाढ झाली आहे. तसेच मृतांचा आकडाही साडेतीन हजाराच्या वर गेला आहे.
● गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाख 79 हजार 257 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3645 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
● देशात गेल्या 24 तासांत 17,68,190 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचा एकूण आकडा 28,44,71,979 झाला आहे.
● देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 79 हजार 257 नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 वर पोहोचली आहे.
● तर दुसरीकडे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 4 हजार 832 इतकी झाली आहे.
● तर 2 लाख 69 हजार 507 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 86 हजार 878 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.