ब्रेकिंग! नागपूरमध्ये कोरोना रुग्णालयाला आग; तीन जणांचा मृत्यू
▪️ नागपुरातील कोरोना रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली . या आगीत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
`▪️ आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
▪️ आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी पळापळ सुरू केली होती.
▪️ आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे.
▪️ घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून आग विझविण्याचं काम सुरु आहे.
▪️ दरम्यान, या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.