जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा उद्रेक
जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा उद्रेक पहायला मिळत आहे. ब्राझीलमध्ये एका दिवसात 4 हजार 195 जणांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे.
ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश झाला आहे.
ब्राझीलमध्ये मंगळवारी कोरोनाचे 86 हजार 979 नवीन रुग्ण समोर आले आहेत. वेळीच यावर उपाययोजना केली नाही तर या महिन्यात 1 लाख ब्राझील नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली असून काही शहरांमध्ये रुग्ण उपचारांच्या प्रतीक्षेत जीव सोडत आहेत. आरोग्य यंत्रणा बर्याच भागात कोसळण्याच्या मार्गावर आहे.
देशातील एकूण मृत्यूची संख्या आता जवळजवळ 337,000 झाली आहे, जी अमेरिकेनंतर दुसर्या क्रमांकावर आहे.