भर दुपारी करंजीत चोरी
दोन घरे फोडून सोने चांदी व रोकड चोरट्यानी केले लंपास
विलास होलगीलवार
पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत करंजी बीट येथे दुपारी बारा वाजता संदीप घोटेकर व सुभाष वासेकर या दोघांची घरे चोरट्यांनी फोडली व सोने चांदी व रोख रक्कम कपाट फोडून लंपास केले संदीप घोटेकर यांच्या घराला बाहेरच्या दरवाजाला कुलूप लावून असून सुद्धा चोरट्यांनी सडाकीच्या साह्याने कुलूप फोडून घरात प्रवेश करून लोखंडी अलमारी असलेल्या ड्रॉप मधून 60 हजार रुपये नगदी व सोने चांदीचे दागिने कानातील चार ग्राम पंगळसूत्र सहा ग्रॅम तोरडी तीन जोडी कंबरपट्टा दहा ग्राम अंगुठी चार ग्राम पोत अर्धा तोडा चोरट्यांनी लंपास केलेला आहे व बाजूचे घर असलेले त्याच वार्डातील सूभाष पांडुरंग वासेकर यांच्या घरातील महिला सदर आंघोळीला गेले असता गोदरेज कंपनीचा लोखंडी कपाट उघडून कपाटाची लॉकर मधून वीस हजार रुपये नगदी व सोन्याचा असलेला बारा ग्राम गोफ पाच ग्राम अंगुठी तीन ग्राम अंगुटी व पाच ग्राम कानातील सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला
करंजी मध्ये भर दिवसा घरफोडी पहिल्यांदाच झाली असून गावात दहशत पसरलेली आहे सदर प्रकरणाची माहिती पांढरकवडा पोलीस स्टेशनला दिलेली असून सदर प्रकरना चौकशीसाठी जमादार जुनूनकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सविस्तर पंचनामा करून अज्ञात चोरांन विरुद्ध चोरी चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे.भरदिवसा चोरी होणे हे फारमोठी दहशत गावातील जनते मध्ये पसरली आहे तरी सदर चोरांचा शोध घेऊन ताबडतोब अटक करण्याची मागणी करंजी ग्रामस्थ करीत आहे