Header Ads Widget

जाहिरातीसाठी संपर्क - 8329609913

ब्रेकिंग न्यूज

6/recent/ticker-posts

डायमंड ज्युबली जांभोरी तामिळनाडूत गुणवत्ता प्राप्त जि.प.शाळा ढोकी(वाई)येथील विद्यार्थ्यांचा अशोक चौधरी यांचे हस्ते सत्कार

डायमंड ज्युबली जांभोरी तामिळनाडूत गुणवत्ता प्राप्त जि.प.शाळा ढोकी(वाई)येथील विद्यार्थ्यांचा अशोक चौधरी यांचे हस्ते सत्कार              

विलास होलगीलवार
पं.स.पांढरकवडा अतंगॅत ढोकी (वाई) जि.प.उच्च प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांचा रंगारंग कायॅक्रम "कलरव एक नयी सोच" दिनांक 13/2/25 रोजी घेण्यात आला या मधे विविधांगी कलागुण,बहारदार नृत्य,नाटीका,विद्यार्थी नकला सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यात आले.याच कार्यक्रमात भारत स्काऊट गाईड या संस्थेच्या वतीने दर चार वषाॅनी होणारा आंतरराष्ट्रीय कायॅक्रम डायमंड जुबली जांबोरी तामिळनाडू राज्यात संपन्न झाला तीथे पं.स.पांढरकवडा तालुका स्काऊट मास्टर श्री दिनेश घाटोळ यांचे मार्गदर्शनात ढोकी वाई जि.प.उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रथमेश संदीप राजुरकर,जय विष्णू कोहचाडे,कु.पूर्वी सदानंद बदखल यांनी सहभाग नोंदवून विषेश नैपुण्य प्राप्त केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ डी.एन.ई.क्र.994 चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष श्रीमान अशोकराव चौधरी यांचे हस्ते   सन्मान चिन्ह,शाल,श्रीफल,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या "कलरव एक नयी सोच"या कायॅक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल बोंडे,प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित अशोकराव चौधरी,विद्या दानव,पोलीस पाटील सौ.येडमे,ग्रामपंचायत सदस्य सौ.सिमा राजुरकर,त्रिवेणी आत्राम,उपसरपंच मिराबाई येडमे,संदिप राजुरकर,सदानंद बदखल,विष्णू कोहचाडे,लखन गेडाम,शाळा व्यवस्थापन समितीमधील सवॅ सदस्य,मुख्याध्यापक शिवदास गायकवाड,शिक्षक दिलीप राजुरकर,दिनेश घाटोळ,सौ.घाटोळ,मिलिंद कांबळे,शंकर भोयर,सुधाकर येडमे मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कायॅक्रमाचे प्रास्ताविक विषय शिक्षक दिनेश घाटोळ यांनी केले असुन सुरेख असे सुत्र संचालन किशोर येडमे यांनी केले असुन आभार तंत्र स्नेही शिक्षक श्री मिलींद कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करणे करीता शाळा व्यवस्थापन समितीमधील सवॅ सदस्य,शाळेतील सवॅ शिक्षक व गावातील नवयुवक यांचे सहकार्य लाभले. कायॅक्रमास गावातील शेकडो नागरिक महीला उपस्थित होत्या.